कोलकातामध्‍ये बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली, ४ ठार, पाच गंभीर | पुढारी

कोलकातामध्‍ये बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली, ४ ठार, पाच गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकातामध्‍ये पाच मजली बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. गार्डन रीच भागात झालेल्‍या या दुर्घटनेत चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अडकले असण्याची शक्यता असल्‍यचे महापौर फिरहाद हकीम यांनी सांगितले.

रविवारी रात्री बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले होते. पोलीस आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन पथकांनी १३ जखमींना रुग्‍णालयात दाखल केले. आज सकाळी उपचार सुरु असडणार्‍या दोन कामगारांचा मृत्‍यू झाल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वाचलेल्यांचा शोध सुरू आहे.

ममता बॅनर्जी यांची दुर्घटनास्‍थळी भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नुकसान भरपाई जाहीर केली

 

 

Back to top button