BS Yediyurappa | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध FIR

BS Yediyurappa | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध FIR

पुढारी ऑनलाईन : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोप प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (वय ८१) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मध्यरात्री बंगळूरमधील सदाशिवनगर पोलिसांनी पोक्सो आणि आयपीसीच्या ३५४ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली. जेव्हा १७ वर्षांची मुलगी तिच्या आईसह फसवणूक प्रकरणात येडियुरप्पा यांची मदत मागण्यासाठी गेली होती. मुलीच्या आईने गुरुवारी संध्याकाळी पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आतापर्यंत येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य जारी केलेले नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news