इलेक्टोरल बाँडमध्ये भाजप मालामाल; तब्बल ६ हजार कोटींवर निधी, पहा कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला

इलेक्टोरल बाँडमध्ये भाजप मालामाल; तब्बल ६ हजार कोटींवर निधी, पहा कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडशी (Electoral bonds) संबंधित माहिती सार्वजनिक केली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 12 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाला (ECI) निवडणूक रोख्यांशी संबंधित डेटा प्रदान केला होता. त्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर डेटा अपलोड करण्यात आला. SBI कडून प्राप्त झालेला इलेक्टोरल बाँड डेटा जसा आहे तसा वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या निवडई/णूक रोख्यांमध्ये (Electoral bonds) राजकीय पक्षांना किती निधी मिळाला याबाबत सविस्तर माहिती आहे. यामध्ये भाजप पक्ष आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि इतर काही पक्षांनाही निधी मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजपला ६ हजार ६० कोटी ५१ लाख इतका निधी मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर काँग्रेसला १ हजार चारशे २१ कोटी ८६ लाख इतका निधी मिळाला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर इतरही काही पक्षांनी ही निवडणूक रोखे घेतल्याची माहिती आहे.

राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या

रक्कम रुपये  –  पक्ष  – एकूण बॉण्डची संख्या

6060,51,11,000 – भाजप – 8633
1421,86,55,000 – काँग्रेस – 3146
65,45,00000 – आम आदमी पार्टी –  245
14,05,00000 – समाजवादी पार्टी – 46
6,05,00000 – एआयडीएमके – 38
1609,53,14,000 – तृणमूल काँग्रेस – 3305
1214,70,99,000 – बीआरएस – 1806
14,00,000,00 – जनता दल युनायटेड – 14
775,50,000,00 – बिजू जनता दल – 861
639,00,000,00 – डीएमके – 648
35,00000 – गोवा फॉरवर्ड पार्टी – 17
50,00000 – नॅशनल कॉन्फरन्स – 5
21,0000000 – जनसेना पार्टी – 39
43,50,00000 – जनता दल सेक्युलर – 75
13,50,00000 – झारखंड मुक्ती मोर्चा – 45
55,00000 – महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी – 28
31,0000000 – राष्ट्रवादी – 121
73,50,00000 – राष्ट्रीय जनता दल – 150
7,26,00000 – शिरोमणी अकाली दल – 33
158,38,14,000 – शिवसेना – 354
5,50,00000 – सिक्कीम डेमोक्रॅटिक पार्टी – 10
36,50,00000 – सिक्कीम क्रांती मोर्चा – 50
218,88,00000 – तेलुगु देसम पार्टी – 279
337,0000000 – वायएसआर काँग्रेस – 472

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news