‘वन नेशन वन इलेक्शन’ अहवाल राष्ट्रपतींना सादर | पुढारी

'वन नेशन वन इलेक्शन' अहवाल राष्ट्रपतींना सादर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील समितीने आज ( दि. १४) ‘वन नेशन वन इलेक्शन’ (एक राष्‍ट्र एक निवडणूक) अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. ‘वन नेशन वन इलेक्शन’ (एक राष्‍ट्र एक निवडणूक)साठी माजी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील समितीची २ सप्‍टेंबर २०२३ रोजी स्‍थापन झाली होती. या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंग, माजी लोकसभेचे महासचिव सुभाष कश्यप आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा समावेश होता.

या समितीने १८,६२६ पृष्‍ठांचा अहवाल सादर केला आहे. समितीने लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसह पंचायत आणि नगरपालिकांच्या एकाचवेळी निवडणुका घेण्यास सक्षम करण्यासाठी कलम 324A लागू करण्याची शिफारस केली आहे. तसेच लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. तसेच 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी सूचना त्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button