दिल्ली : शाहदरा भागात घराला भीषण आग, दोन मुलींसह ४ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

दिल्ली : शाहदरा भागात घराला भीषण आग, दोन मुलींसह ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील शाहदरा भागातील शांतीनगर येथील एका इमारतीला भीषण आग लागून दोन लहान मुलींसह चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाहदराचे डीसीपी सुरेंद्र चौधरी यांनी आग लागल्याची माहिती दिल्याचे वृत्त आहे. मनोज (वय ३०), पत्नी सुमन (वय २८), दोन लहान मुवी (वय ५ आणि ३) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन आणि पोलिसांना घटनास्थ‍ळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारी उपस्थितीत राहिले. दिल्ली पोलिसांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एक स्थानिक रहिवासी शंकर लाल यांचे म्हणणे आहे की, ”अंडरग्राउंड पार्किंगमध्ये उभारलेल्या गाड्यांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कारमध्ये आग लागल्यानंतर इमारतीत आग पसरली. काही मुले आणि वृद्ध लोक होते. शिवाय तळमजल्यावर पार्किंगमध्ये एक कुटूंब राहत होते.

Back to top button