Lok Sabha Election 2024 : गरीब महिलांना वार्षिक एक लाखाची मदत देणार! निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ५ आश्वासने | पुढारी

Lok Sabha Election 2024 : गरीब महिलांना वार्षिक एक लाखाची मदत देणार! निवडणुकीपूर्वी काँग्रेसची ५ आश्वासने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी सोशल मीडियावर ‘महालक्ष्मी न्याय गॅरंटी’ योजनेचे आश्वासन दिले. योजनेंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सरकारी नियुक्त्यांमध्ये महिलांना निम्मा वाटा मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.

काँग्रेसने ५ योजना जाहीर केल्या असून, त्या खालीलप्रमाणे आहेत…

१) महालक्ष्मी न्याय गॅरंटी : गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक १ लाख रुपयांची मदत.
२) निम्मे आभाळ-निम्मा हक्क : यांतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा मिळेल.
३) शक्ती सन्मान या योजनेंतर्गत अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनातील केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल.
४) हक्कांची जाणीव : महिलांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी म्हणून व अपेक्षित मदत मिळावी म्हणून प्रत्येक पंचायतीमध्ये एक कायदेशीर सहायक अधिकारी नियुक्त केला जाईल.
५) सावित्रीबाई फुले वसतिगृह : सर्व जिल्हा मुख्यालयांत नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह बांधले जाईल. संपूर्ण देशात ही योजना राबविली जाईल.

मी ८३ वर्षांचा झालो आहे. निवडणुकीत इतरांना संधी मिळायला हवी, अशी माझी भूमिका आहे. कार्यकर्त्यांचा फार आग्रह असेल, तर लोकसभा निवडणूक लढेनही.
– मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

हेही वाचा : 

Back to top button