भाजपच्या दुसऱ्या यादीतील पाच महिला उमेदवारांची नावे चर्चेत

भाजपच्या दुसऱ्या यादीतील पाच महिला उमेदवारांची नावे चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : BJP Lok Sabha List : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आज (दि.13) दुसरी यादी जाहीर केली. आजच्या या दुसऱ्या यादीत अनेक नवीन चेहरे पहायला मिळाले आहेत. या महिला उमेदवार चेहऱ्यांमुळे भाजपची दुसरी यादी चर्चेत आली आहे.

मागच्या आठवड्यात लोकसभेची पहिली यादी जाहीर केली होती, त्यात महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. पण दुस-या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महिला उमेदवारांची नावे पहायला मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही पाचही नावे महिला उमेदवारांची आहेत. हिना गावित, स्मिता वाघ रक्षा खडसे, भारती पवार, पंकजा मुंडे अशी या पाच महिला उमेदवारांची नावे आहेत.

महाराष्ट्रातील दुसऱ्या यादीतील नावे आणि मतदारसंघ

नितीन गडकरी (नागपूर), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), पंकजा मुंडे (बीड), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), भारती पवार (दिंडोरी), अनुप धोत्रे (अकोला), रावसाहेब दानवे (जालना), सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), संजयकाका पाटील (सांगली), रणजीत निंबाळकर (माढा), पियुष गोयल (उत्तर मुंबई), मिहीर कोटेचा (उत्तर पूर्व), सुधाकर श्रृंगारे (लातूर), स्मिता वाघ (जळगाव), कपिल पाटील (भिवंडी), रामदास तडस (वर्धा), डॉ. हिना गावित (नंदुरबार).

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news