BJP Lok Sabha List : लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर! महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश | पुढारी

BJP Lok Sabha List : लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर! महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : BJP Lok Sabha List : भाजपने बुधवारी (दि.13) लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी भाजपने गेल्या आठवड्यात 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. पण दुस-या यादीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.

दुसरी यादी प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रासह 10 राज्यांवर केंद्रित आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि एमएल खट्टर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तर गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा अधिसूचित करण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाची यादी येत आहे.

बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतील महाराष्ट्रातील नावे :

नितीन गडकरी (नागपूर), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), पंकजा मुंडे (बीड), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), भारती पवार (दिंडोरी), अनुप धोत्रे (अकोला), रावसाहेब दानवे (जालना), सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), संजयकाका पाटील (सांगली), रणजीत निंबाळकर (माढा), पियुष गोयल (उत्तर मुंबई), मिहीर कोटेचा (उत्तर पूर्व), सुधाकर श्रृंगारे (लातूर), स्मिता वाघ (जळगाव), कपिल पाटील (भिवंडी), रामदास तडस (वर्धा), डॉ. हिना गावित (नंदुरबार).

Back to top button