गाझीपूरमध्ये भीषण अपघात
गाझीपूरमध्ये भीषण अपघात

गाझीपूरमध्ये भीषण अपघात; बसवर हायटेंशन वायर पडून लागली आग; १० जणांच्या मृत्‍यूची भीती

Published on

गाझीपूर ; पुढारी ऑनलाईन उत्‍तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. चालल्‍या बसवर हाय टेंशन वायर पडल्याने बसला आग लागली. या दुघटणेत जवळपास १० लोकांचा जळून मृत्‍यू झाल्‍याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. एका लग्‍न सोहळ्यातून लोक या बसमधून परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक घटनास्‍थळी पोहोचले आहेत.

बस मऊ च्या कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन मरदह येथील महाहर धाम येथे येत होती. यावेळी कच्च्या रस्त्यावरून येणाऱ्या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३५ हून अधिक लोक होते. मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्‍त केले आहे. त्‍यांनी अधिकाऱ्यांना तात्‍काळ मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. आगीत जळालेल्‍या लोकांना उपचारांसाठी तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :   

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news