मायावतींची मोठी घोषणा : लोकसभा निवडणूक स्‍वबळावर लढविणार

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. ( संग्रहित छायाचित्र )
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज (दि. ९ मार्च_ बहुजन समाज पक्षाच्या ( बीएसपी) अध्यक्षा मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष लोकसभा निवडणूक स्‍वबळावर लढेल, असे त्‍यांनी जाहीर केले आहे. त्‍यामुळे आता बीएसपी तिसरी आघाडी किंवा  अन्‍य काेणत्‍या राजकीय पक्षाबराेबर युती करेल, अशा राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून स्‍वळावर निवडणूक लढविणार असल्‍याचे जाहीर केले. आपल्‍या पोस्‍टमध्‍यरे मायवती यांनी म्‍हटलं आहे की, बहुजन समाज पक्ष संपूर्ण तयारी आणि ताकदीने देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढत आहे. अशा स्थितीत निवडणूक युती किंवा तिसरी आघाडी स्थापन करणार या अफवा आहेत. यासंदर्भात कोणत्‍याही अफवा पसरवू नयेत. बहुजन समाजाच्या हितासाठी बसप एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news