

पुढारी ऑनलाईन डेस्क : इनकम टॅक्स विभागाने काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केली होती, या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी काँग्रेस पक्षाची याचिक द इनकम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलने शुक्रवारी फेटाळली आहे. काँग्रेस पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागण्यात आली होती, या काळात कारवाईवर स्थगिती देण्याची मागणी ट्रिब्युनलने फेटाळली आहे.
आयकर विभाग आणि काँग्रेस पक्षात २०१९पासून करासंदर्भात वाद सुरू आहे. २०१८-२०१९पासूनच्या कराचा हा वाद आहे. २०१८-२०१९ला टॅक्स क्लेम १०३ कोटींचा होता, तो नंतर १०५ कोटी असा रिव्हाईज करण्यात आला. त्यात ३० कोटींचे व्याज मिळवल्यानंतर १३५ कोटी रुपये इतका हा टॅक्स क्लेम झाला आहे.
आयकर विभागाने चुकीच्या पद्धतीने पक्षाच्या बँक खात्यातून ६५ कोटी रुपये काढून घेतल्याचा दावा काँग्रेसने ट्रिब्युनल समोर केला होता. १६ फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाचे मुख्य खाते गोठवण्यात आले होते. त्यानंतर ट्रिब्युनलने सुनावणी काळात खाते वापरण्यास परवानगी दिली होती. आमचा पक्ष १०० वर्षं जुना पक्ष आहे. आम्ही निवडणुकीत भाग घेऊ नये यासाठी हे सर्व सुरू आहे, असे पक्षाच्या वकिलांनी म्हटले होते. आयकर विभागाने मात्र काँग्रेसचे हे म्हणणे फेटाळले होते.
हेही वाचा