

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन आज ( दि. १) अंतरिम अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये (आयकर रचना) कोणता बदल करणार याकडे लाखो भारतीय करदात्या विशेषतः पगारदार वर्गाला लक्ष वधले होते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये काेणताही बदल केलेला नाही, असे स्पष्ट केले.
आयकर स्लॅबमधील बदलांपासून ते सवलतींपर्यंत, करदाते त्यांच्या आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक धोरणांवर प्रभाव टाकणार्या या निवडणूक वर्षात आर्थिक विकासाला चालना आणि वित्तीय शिस्त, असे दुहेरी आव्हान स्वीकारताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी आयकर स्लॅबमध्ये काेणताही बदल हाेणार नाही, असे स्पष्ट केले.
'प्रत्यक्ष कर संकलन 10 वर्षांत तीन पटीने वाढले आहे. करदात्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. देशाच्या विकासात करदात्यांच्या योगदानाचा उपयोग होत आहे. आम्ही करदात्यांची प्रशंसा करतो. सरकारने कराचे दर कमी केले आहेत. लागू करण्यात आलेल्या नवीन कर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. नवीन फॉर्म 26AS सह कर भरणे सोपे झाले आहे. 2013-14 मध्ये 93 दिवसांऐवजी आता 10 दिवसात परतावा दिला जात आहे, असेही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.