LPG cylinder prices | महिला दिनी पीएम मोदींची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

LPG cylinder prices | महिला दिनी पीएम मोदींची मोठी घोषणा, LPG सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

पुढारी ऑनलाईन : आज महिला दिनी केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी खुशखबर दिली आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत केली आहे. "सरकारने एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: याचा आपल्या नारी शक्तीला फायदा होईल." असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (LPG cylinder prices)

स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणारा बनवणे तसेच कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचेदेखील आमचे ध्येय आहे. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी 'जीवन जगणे सोपे होणे' हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे, असे पीएम मोदी यांनी पुढे नमूद केले आहे.

पीएम मोदींनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आम्ही नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि क्षमतेला सलाम करतो आणि त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या आम्ही कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रात पुढाकार घेऊन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कर्तृत्वावरूनही हे दिसून येते, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी आर्थिक वर्षासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्रति एलपीजी सिलिंडर ३०० रुपये अनुदान देणे सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याच्या एका दिवसानंतरच आता एलपीजीच्या दरात १०० रुपयांची कपात केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने १४.२ किलो वजनाच्या प्रति सिलिंडरच्या अनुदानात २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढ केली होती.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात २०० रुपयांची कपात केली होती. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर ९०३ रुपये आहे आणि आजच्या कपातीमुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दर ८०३ रुपयांपर्यंत खाली येईल. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचा दर ९०२.५ रुपये आहे, तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे ९२९ रुपये आणि ९१८.५० रुपये आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news