

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी त्यांच्या राजकीय घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले. आता ते लोक म्हणतात की, मोदींना कुटुंब नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की १४० कोटी देशवासीय हेच माझे कुटुंब आहे. ज्यांना कोणीही नाही. तेही मोदींचे आहेत आणि मोदीही त्यांचा आहे. माझा भारत हाच माझा परिवार आहे," अशा शब्दांमध्ये आज ( दि. ४ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना प्रत्युत्तर दिले. ते तेलंगणामधील आलिदाबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.
लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटणा येथील रॅलीत पंतप्रधान मोदींना घराणेशाहीच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले होते. तसेच त्यांच्या हिंदू असण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी जेव्हा राजकारणातील घराणेशाहीर बोलत तेव्हा ते माझ्यावर टीका करतात. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात गुरफटलेले विरोधी आघाडीचे नेते अस्वस्थ होतात. मोदींना कुटुंब नाही, असे म्हणतात. आता त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांचा खरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.मी त्यांना सांगू इच्छितो की 140 कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. ज्यांना कोणीही नाही, तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच. माझा भारत माझा परिवार आहे."
सोमवारी पंतप्रधान मोदींनी तेलंगणातील आदिलाबादमध्ये ५६ हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज आदिलाबादची भूमी केवळ तेलंगणाचाच नाही तर संपूर्ण देशाचा विकास पाहत आहे. आज मला येथील ३० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी करण्याची संधी मिळाली आहे. 56 हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प तेलंगणासह देशातील अनेक राज्यांमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :