Lucknow News : डीजेच्या तालावर तिघे थिरकले, अचानकपणे प्राणाला मुकले | पुढारी

Lucknow News : डीजेच्या तालावर तिघे थिरकले, अचानकपणे प्राणाला मुकले

लखनौ ः डीजेच्या तालावर थिरकत असताना विजेची तार तुटून झालेल्या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कौशंबीत एका लग्नघरावर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( Lucknow News )

संबंधित बातम्या 

कौशंबीतील रामनगर येथे शनिवारी रात्री वरातीमध्ये डीजे उच्चदाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. दुल्हनियापूर गावात राहणार्‍या पिंटूचे लग्न रामनगरमधल्या अमृता प्रजापतीसोबत होणार होते. रात्री नियोजित वेळेनुसार लग्नाची वरात रामनगर येथे पोहोचली. नाश्ता झाल्यावर डीजेच्या तालावर नाचत लग्नाची वरात वधूच्या घराकडे निघालेली असताना हा धक्कादायक अपघात घडला. पाऊस असल्यामुळे डीजेवर छत्री धरली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ( Lucknow News )

Back to top button