Mauritius fire | मॉरिशसमध्ये महाशिवरात्रीच्या तयारीदरम्यान भीषण आग, ६ भाविकांचा मृत्यू | पुढारी

Mauritius fire | मॉरिशसमध्ये महाशिवरात्रीच्या तयारीदरम्यान भीषण आग, ६ भाविकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉरिशसमध्ये रविवारी (दि.०३) एका धार्मिक उत्सवाच्या तयारीदरम्यान लागलेल्या भीषण आगीत ६ हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. महाशिवरात्रीच्या आधीच्या एका उत्सवादरम्यान ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. (Mauritius fire)

मॉरिशस पोलिस आयुक्त अनिल कुमार दीप यांनी एका राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर दिलेल्या माहितीत सांगितले की, हिंदू देवतांच्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या लाकडी आणि बांबूच्या गाडीला विद्युत तारांच्या संपर्कात आल्यानंतर ही आग लागली. त्यानंतर अनेक लोक या आगीत अडकले. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याचेदेखील वृत्तात म्हटले आहे. (Mauritius fire

Mauritius fire : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केले दुःख

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी या दुर्घटनेवर एक्स पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मॉरिशसमध्ये महाशिवरात्री उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल ऐकून दुःख झाले. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबीय आणि मॉरिशसच्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.”

हेही वाचा:

Back to top button