PM Surya Ghar Muft Bijli Yojana: ३० दिवसांच्या आत आपल्या बँक खात्यात सबसिडी कशी मिळवावी? | पुढारी

PM Surya Ghar Muft Bijli Yojana: ३० दिवसांच्या आत आपल्या बँक खात्यात सबसिडी कशी मिळवावी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने पीएम-सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. घराच्या छतावर हे सोलर पॅनेल बसवण्यात येईल. (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) एक कोटी घरांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत ऊर्जा देण्यासाठीची ही योजना आहे. सरकारने सौर योजनेसाठी एक मोठी मोहीम सुरु केली आहे. (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

‘पीएम सूर्यघर’ देणार मोफत वीज

केंद्र सरकारने सोलर वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थींना ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सोलर पॅनेलला येणाऱ्या खर्चापैकी ६० टक्के रकमेची सबसिडी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

सोलर पॅनेल आणि इतर यंत्रणा उभी करण्यासाठी ग्राहकांना उर्वरित रकमेसाठी राष्ट्रीय बँकेतून ७ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जास्तीतजास्त तीन केव्हीए वीज निर्मिती करणारे सोलर एनर्जी पॅनेल आपल्या लावता येणार आहेत. या योजनेतून ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे.

असा करा अर्ज

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या लिंकवर जाऊन रजिस्टर करावं लागेल. अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, सबसिडीसाठी नॅशनल पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. तिथे देण्यात आलेल्या वेंडरोंमध्ये लोक आपल्या पसंतीचे वेंडर निवडू शकतात. हे वेंडर रूफटॉप सोलर इंस्टॉल करतील. वेंडरकडून इंस्टॉलेशनपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिस्कॉम द्वारा नेट मीटरिंग केले जाईल. सर्टिफिकेट पोर्टलवर अपलोड केलं जाईल आणि सबसिडी थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात येईल. नॅशनल पोर्टलवर लोकांना माहिती दिली जाईल. ज्याच्या मदतीने ते आपल्या गरजेच्या हिशोबाने योग्य सिस्टिम साईजची निवड करू शकतील.

स्टेप १ – https://pmsuryaghar.gov.in या पोर्टवर रजिस्टर करा. तुमचे राज्य आणि विद्युत वितरण कंपनी निवडा. विद्युत उपभोक्ता संख्या (Electricity Consumer Number), मोबाईल क्रमांक आणि ई-मेल टाका.

स्टेप २ – Consumer Number आणि मोबाईल क्रमांकासोबत लॉगिन करा. रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.

स्टेप ३ – एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर, तुमच्या डिस्कॉममधील (DISCOM) नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून (रजिस्टर्ड वेंडर्स) प्लांट निवडा.

स्टेप ४ – पहिले इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्लांटचे डिटेल्स सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

स्टेप ५ – नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले होईल.

स्टेप ६ – एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल्ड चेक (cancelled cheque) सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.

ठाकुर यांनी सांगितले की, या स्कीममधून आरडब्ल्यूएलादेखील फायदा होईल. डिस्कॉमला आधारभूत फ्रेम अपग्रेड करावं लागेल आणि भारत सरकार त्यांना इन्सेंटिव देईल. पंचायती राज संस्थांनादेखील लाभ होईल. केंद्र सरकारच्या सर्व भवनवर २०२५ पर्यंत रूफ टॉप सोलर पॅनल लावले जाईल. भारतात तयार करण्यात आलेल्या मॉड्यूलला देखील या योजनेत सहभागी करून घेतलं जाईल. या योजनेच्या माध्यमातून थेट १७ लाख लोकांना रोजगाराची संधी मिळेल.

Back to top button