MP Accident : पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार, २० जखमी | पुढारी

MP Accident : पिकअपला भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने १४ ठार, २० जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील दिंडोरी येथील बडझार घाटात पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने पलटी झाले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दिंडोरी जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी ही माहिती दिली. (MP Accident)

शाहपुरा पोलिस स्टेशन आणि बिचिया पोलिस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटात हा अपघात झाला. अपघातातील जखमी बेबी शॉवरला उपस्थित राहून माघारी परतत होते. त्यांच्यावर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. (MP Accident)

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाखांची मदत

दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कॅबिनेट मंत्री श्रीमती संपतिया उईके या दिंडोरी येथे पोहोचल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button