गुजरातेत 2 हजार कोटींचे 3,300 किलो ड्रग्ज जप्त | पुढारी

गुजरातेत 2 हजार कोटींचे 3,300 किलो ड्रग्ज जप्त

पोरबंदर; वृत्तसंस्था : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), गुजरात एटीएस, नौदल आणि केंद्रीय यंत्रणांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत अरबी समुद्रातील भारतीय हद्दीतून 2 हजार कोटी रुपयांवर किमतीचे 3,300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. पाच विदेशी ड्रग्ज तस्करांनाही या संयुक्त पथकाने अटक केली. इराणी बोटीतून प्रवास करत असलेल्या तस्करांना संयुक्त पथकातील हेलिकॉप्टरच्या निरीक्षणाखाली किनार्‍यापर्यंत दामटण्यात आले, हे विशेष!

हे पाचही तस्कर इराणी, पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगण्यात येते. याआधी गीर सोमनाथ येथील पोलिसांनी वेरावळ शहरातील घाटात 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. तेव्हापासून दिल्ली एनसीबी, गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणा सातत्याने ड्रग्ज तस्करांच्या मागावर आहेत. एकप्रकारची मोहीमच ड्रग्ज तस्करीविरोधात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत सागरी सीमेतून जप्त करण्यात आलेली ड्रग्जची ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेप आहे. वेरावळमधून याआधी 9 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती.

Back to top button