मतदानासाठी आधार कार्डची सक्ती नाही ः निवडणूक आयोग | पुढारी

मतदानासाठी आधार कार्डची सक्ती नाही ः निवडणूक आयोग

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मतदानासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. पश्चिम बंगालमधील अनेक नागरिकांचे आधार कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांची भेट घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या वतीने मतदानावेळी आधार कार्ड नसले तरी मतदानापासून कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मतदार ओळखपत्र अथवा अन्य ओळखीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येईल, असेही आयोगाच्या वतीने नमूद करण्यात आले.

Back to top button