राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी सुलतानपूर न्‍यायालयाने मंजूर केला जामीन

राहुल गांधी. ( संग्रहित छायाचित्र )
राहुल गांधी. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी यांनी २०१८ मध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍याबाबत वादग्रस विधान केले होते. या प्रकरणी मानहानीचा खटला सुलतानापूर न्‍यायालयात सुरु आहे. याप्रकरणी आज न्‍यायालयाने राहुल गांधी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. ( UP court gives Rahul Gandhi bail in 2018 defamation case )

मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज सुलतानापूर न्यायालयात हजर झाले. यावेळी कडक बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, अशी माहिती वकील संतोष पांडे यांनी दिली. ते म्हणाले की, "राहुल गांधी यांनी आज न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज सादर करण्‍यात आला. त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची सुरक्षा आणि 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news