पुढारी ऑनलाईन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी ) आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्यांचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार केला आहे. पंजाबमधील शेतकर्यांनी आज (दि.१५) राजपुरा, पटियाला येथे रेल रोको आंदोलन केले.आंदोलक शेतकरी पंजाबमधील रेल्वे स्थानकांवर आले. त्यांनी रेल्वे रुळांवर कब्जा केला.
केंद्रीय मंत्री कृषी मंत्री अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद राय आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. ( Farmers Protest Updates) मागील बैठका निष्फळ ठरल्या असून, शेतकऱ्यांनी मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा काढला होता. .
'दिल्ली चलो' मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी हजारो आंदोलक तेथेच थांबल्याने हरियाणाच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी पंजाबमधील शेतकऱ्यांवर अश्रूधुराचे नळकांड्यां फोडल्या. पोलिसांनी बॅरिकेड्सच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांनी बॅरिकेड्सजवळ तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. किमान समर्थनाची कायदेशीर हमी मागणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला आहे.