पुढारी ऑनलाईन डेस्क : रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कर्तव्य) आणि ट्रान्सफॉर्म (पारदर्शकता) हाच आमचा १७ व्या लाेकसभेतील 17th (Lok Sabha session) कार्यकाळातील मंत्र राहिला आहे. ही पाच वर्षे खूप आव्हानात्मक राहीली. या १७ व्या लोकसभेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. G-20 परिषदेमुळे देश प्रगती करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी (PM Modi) आज (दि. १०) केले. लाेकसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी मागील पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विकासकार्याचा आढावा घेतला.
यावेळी पंतप्रधान माेदी म्हणाले की, "संसदेचं ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. याच लोकसभेनं कलम ३७० हटवण्यात आले. याच लोकसभा काळात तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला. नारी शक्ती वंदन विधेयक देखील याच कार्यकाळात आणले गेले आहे. या ५ वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत." (PM Modi 17th Lok Sabha session)
खासदारांना कॅन्टीनमध्ये स्वस्तात जेवण मिळतं असं ऐकायला मिळत होतं, पण तुम्ही (लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला) कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी सारखेच दर असतील असं ठरवलं आणि खासदारांनी त्याला कधी विरोध केला नाही. पंतप्रधान म्हणाले की, संसदेची नवीन इमारत असावी असावी असं सर्वांना वाटत होतं, त्यावर सर्वांनी चर्चा देखील केली, पण निर्णय झाला नाही. पण देशाने निर्णय घेतला आणि परिणामी देशाला संसदेची नवी इमारत मिळाली.
दहशतवादाविरोधात आम्ही कडक कायदे केलेले आहेत. देशाचं स्वप्न एक संविधान होतं. येणारी २५ वर्षे महत्त्वपूर्ण असतील. जम्मू-काश्मिरच्या लोकांना सामाजिक न्याय दिला आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नमूद केले. प्रत्येक राज्याने आम्हाला सामर्थ्य दिले आहे. निवडणूकाच देशाची शाण वाढवणार आहेत. भारत जगासाठी रिसर्च हब बनेल. सबका साथ सबका विकास हा विकास मंत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत असे प्रतिपादन देखील पीएम मोदींनी केले. (PM Modi 17th Lok Sabha session)
देश 75 वर्षे इंग्रजांनी दिलेल्या दंड संहितेखाली जगत राहिला. देशाची येणारी पिढी न्यायालयीन संहितेनुसार जगेल, हा संदेश आम्ही नव्या पिढीला देऊ. नवीन सदनाची सुरुवात भारताच्या मूलभूत मूल्यांवर भर देणाऱ्या कामाने झाली आहे, तो म्हणजे नारी शक्ती वंदन कायदा. आगामी काळात या सभागृहात मोठ्या संख्येने माता-भगिनी बसणार आहेत असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
हेही वाचा