युक्तिवाद करताना हार्ट अ‍ॅटॅक; वकिलाचा न्यायालयातच मृत्यू | पुढारी

युक्तिवाद करताना हार्ट अ‍ॅटॅक; वकिलाचा न्यायालयातच मृत्यू

गोपालगंज ः बिहारमध्ये एका वकिलाचा युक्तिवाद करत असताना हार्ट अ‍ॅटॅकमुळे न्यायालयातच मृत्यू झाला आहे. दिलीप कुमार त्रिपाठी यांना युक्तिवाद करताना सुरुवातीला चक्कर आली. तरीही स्वतःला सावरत ते पटकन तेथील खुर्चीत बसले. नंतर काही क्षणातच त्यांनी मान टाकली. ते कसलीच हालचाल करत नसल्याचे दिसून येताच न्यायाधीशांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

विशेष म्हणजे यापूर्वी त्यांना कसलाही त्रास झाला नव्हता. ते कोणत्याच तणावाखाली नव्हते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे सहकारी वकीलही हादरले आहेत.

Back to top button