SIMI : ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ संघटनेवरील बंदीला पाच वर्षांची मुदतवाढ   | पुढारी

SIMI : ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ संघटनेवरील बंदीला पाच वर्षांची मुदतवाढ  

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) संघटनेवरील बंदी केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवली आहे. जातीय सलोखा बिघडविणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग या आरोपांच्या आधारे गृहखात्याने गुन्हेगारी कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) सिमीवर ३१ जानेवारी २०१९ मध्ये बंदी घातली होती. कालावधी संपण्याआधीच गृहमंत्रालयाने या बंदीला मुदतवाढ दिली आहे. सिमी ही संघटना दहशतवादाला प्रोत्साहन देत असून शांतता आणि जातीय सलोखा बिघडवत आहे, हे भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोहोचवणारे आहे. युएपीए अंतर्गत सिमी संघटनेवर आणि सदस्यांवर खटले सुरू असल्याचेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button