Delhi News: दिल्लीतील कालकाजी मंदिरात स्टेज कोसळून, चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू | पुढारी

Delhi News: दिल्लीतील कालकाजी मंदिरात स्टेज कोसळून, चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळले. या दुर्घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर १७ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.२७) मध्य रात्री घडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, स्टेज कोसळल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमधीध्ये एक महिला गंभीर झाली. तिला ऑटोमधून दोन लोकांनी तातडीने रुग्णालयात नेले, परंतु पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जखमींना एम्स ट्रॉमा सेंटर, सफदरजंग हॉस्पिटल आणि मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत फ्रॅक्चर झालेल्या काहींची प्रकृती आता स्थिर आहे, असेही पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

शनिवारी मध्यरात्री दिल्लीतील कालकाजी मंदिरात ‘जागरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात रात्रभर जागरण, गाणी, नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवतांच्या पूजा, हिंदू धार्मिक विधी देखील पार पडले. प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीत निर्माते बी प्राक कार्यक्रमात परफॉर्म करत असताना उत्साही झाल्यानंतर अनेक लोक स्टेजवर चढले. स्टेज जास्त वजन सहन करू शकला नाही आणि परिणामी कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button