Golden tiger | राजेशाही थाट! काझीरंगात दुर्मिळ सोनेरी वाघाचे दर्शन, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला फोटो

Golden tiger | राजेशाही थाट! काझीरंगात दुर्मिळ सोनेरी वाघाचे दर्शन, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला फोटो

Published on

पुढारी ऑनलाईन : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गोल्डन टायगर म्हणजेच सोनेरी वाघाचे (Golden tiger) पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकताच आढळून आलेल्या सोनेरी वाघाचा फोटो शेअर केला आहे. राजेशाही थाट! काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक दुर्मिळ सोनेरी वाघ दिसला, असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

गोल्डन टायगर, ज्याला गोल्डन टॅबी टायगर असेदेखील म्हटले जाते. हा विशिष्ट रंग भिन्नतेचा एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. जो सध्या केवळ बंदिस्त वाघांमध्ये आढळणाऱ्या अप्रभावी जनुकामुळे (recessive gene) होतो. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात २०२३ मध्ये 'गोल्डन टायगर' दिसला होता. त्यानंतर नुकतेच पुन्हा त्याचे काझीरंगात दर्शन झाले आहे.

काझीरंगा हे बंगाल टायगर आणि बिबट्यांसह मोठ्या मांजर कुळातील अनेक प्रजातींसाठी आफ्रिकेबाहेरील काही वन्य प्रजनन क्षेत्रासाठी सुरक्षित अधिवास म्हणून ओळखला जातो. सध्या येथे वाघांची घनता सर्वाधिक आहे. आसाममध्ये वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, आसाममध्ये २२७ वाघ आहेत. राज्यात २००६ मध्ये ७० वाघ होते. २०१० मध्ये ही संख्या १४३ वर पोहोचली. २०१४ मध्ये वाघांची संख्या १६७ वर गेली. २०१८ मध्ये ती १९० आणि २०२२ मध्ये २२७ होती.

आसाममध्ये चार व्याघ्र प्रकल्प आहेत. मानस, काझीरंगा, ओरंग आणि नामेरी अशी त्यांची नावे आहेत. मानस, काझीरंगा आणि ओरंगमध्ये वाघांची संख्या अधिक वाढली आहे. काझीरंगा व्याघ्र प्रकल्प (KTR) हा ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर मैदानात आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये भारतीय गेंड्यांची संख्या सर्वाधिक आहे.

भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती?

हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) : हवामान सौम्य आणि कोरडे असल्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी हा कालावधी योग्य आहे. हिवाळ्यात गेंडे दिसण्याची शक्यता जास्त असते.

उन्हाळा (एप्रिल ते मे) : या काळात हवामान कोरडे असते; पाणवठ्याभोवती प्राणी पाहायला मिळतात.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news