Desert Knight Exercise : भारतीय हवाई दलाचा फ्रान्स, यूएई सोबत डेझर्ट नाइटचा सराव | पुढारी

Desert Knight Exercise : भारतीय हवाई दलाचा फ्रान्स, यूएई सोबत डेझर्ट नाइटचा सराव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवाई दलाने (IAF) 23 आणि 24 जानेवारी रोजी फ्रान्स हवाई आणि अंतराळ दल (FASF) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हवाई दलासह डेझर्ट नाइटचा सराव केला. तीन देशांच्या हवाई दलांमधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्याचा या सरावामागील मुख्य उद्देश होता. अरबी समुद्रावरील भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कवायतींमुळे हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडले.

फ्रान्सच्या सहभागामध्ये राफेल लढाऊ विमान आणि मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्टचा समावेश होता, तर UAE हवाई दलाने F-16 उतरवले होते. ही विमाने UAE मधील अल धफ्रा हवाई तळावरून कार्यरत होती. भारतीय हवाई दलात Su-30 MKI, MiG-29, Jaguar, AWACS, C-130-J आणि एअर टू एअर रिफ्यूलर विमानांचा समावेश होता. भारतीय एफआयआरमधील सराव अरबी समुद्रावर आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आयएएफ विमाने भारतातील तळांवरून कार्यरत होती.

सरावादरम्यान झालेल्या संवादांमुळे सहभागींमध्ये ऑपरेशनल ज्ञान, अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ झाली. अशा प्रकारचे सराव आयएएफच्या पराक्रमाचे प्रदर्शन करण्याव्यतिरिक्त, प्रदेशातील वाढत्या राजनैतिक आणि लष्करी परस्परसंवादाचे सूचक आहेत.

Back to top button