अद्भुत..! प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यावेळी राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी (पाहा व्‍हिडिओ)

अद्भुत..! प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यावेळी राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी (पाहा व्‍हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिरात आज ( दि. 22 )  रामलल्‍लाच्‍या प्राणप्रतिष्‍ठा विधी  सुरु असताना भारतीय हवाई दलाच्‍या (आयएएफ) हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात पुष्पवृष्टी केली.

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. दुपारी अभिजीत मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास प्रारंभ झाला. 121 आचार्यांकडून धार्मिक विधी झाला. पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत विधी आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा प्रमुख उपस्‍थिती होती.

अयोध्‍येतील राम मंदिरात रामलल्‍लाच्‍या प्राण प्रतिष्‍ठावेळी असताना भारतीय हवाई दलाच्‍या (आयएएफ) हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.

उमा भारतींसह साध्वी ऋतंभरांच्‍या अश्रूंचा बांध फुटला…

अयोध्या 'न भूतो न भविष्यती' सोहळ्यासाठी सज्ज झाली. तब्‍बल ५०० वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत आहे. भगवान श्रीराम आज अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेतअनेक वर्षांपासून स्‍वप्‍न वास्‍तवात उतरल्‍याने भाजप नेत्‍या नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरायांना अश्रू अनावर झाले.  साध्वी ऋतंभरा यांनी उभा भारती यांना मिठी मारली. यावेळी त्‍यांना अश्रू अनावर झाले. अयोध्‍येमधील ऐतिहासिक राम मंदिर उभारणीच्‍या स्‍वप्‍नपूर्तीचे आनंदाश्रू हे सर्वच रामभक्‍तांमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news