रामसेतूच्या प्रारंभ बिंदूवर पंतप्रधान मोदी यांची आराधना | पुढारी

रामसेतूच्या प्रारंभ बिंदूवर पंतप्रधान मोदी यांची आराधना

धनुषकोडी : प्राणप्रतिष्ठेआधी कठोर अनुष्ठान करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामीळनाडूत धनुषकोडी येथील अरिचल मुनाईला भेट देत राम सेतूचा प्रारंभ असलेल्या समुद्रकिनार्‍यावर पुष्पार्पण करत आराधना केली. येथेच प्रभू रामचंद्रांनी रावणाचा निःपात करण्याची शपथ घेत लंकेकडे कूच केली होती.

मोदी यांनी रविवारी धनुषकोडीला भेट दिली. तेथे असणार्‍या श्री कोदंडराम स्वामी मंदिरात श्रीरामांची पूजा केली. येथेच प्रभू रामचंद्रांनी रावणाचा निःपात करण्याची शपथ करण्याची शपथ घेतली व लंकेकडे कूच केली. त्यामुळे धुनषकोडीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान मोदी यांनी तेथे समुद्रकिनार्‍यावर आराधना केली व ध्यानधारणा केली. तसेच सागराला अर्ध्यही दिले.

Back to top button