Ram Mandir Pran Pratishtha ceremony : भाषिक डोलार्‍यातील राम | पुढारी

Ram Mandir Pran Pratishtha ceremony : भाषिक डोलार्‍यातील राम

अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात सर्वच स्‍तरांमध्‍ये अभूतपूर्व असा उत्‍साह आहे. हा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच आनंदाने साजरा केला आहे. ( Ram Mandir Pran Pratishtha ceremony )  जाणून घेवूया जगभरातील भाषांमधील रामायण…

संस्कृतमध्ये 7 रामायणे 

वाल्मीकी, योगवसिष्ठ, अध्यात्म, आनंद, अगस्त्य, अद्भुत, रघुवंशम. हिंदीत 2 : रामचरितमानस, राधेश्याम. ओडियात 13 : बिशी, सुचित्र, कृष्ण, केशव, रामचंद्र बिहार, रघुनाथ विलास, वैदेहिशबिलास, नृसिंह, रामरसामृत, रामरसामृत सिंधू, रामलीला, बाल रामायण, बिलंका. तेलुगूत 3 : भास्कर, रघुनाथ, रंगनाथ, भोल्ल. कन्नडमध्ये 4 : कुमुदेन्दू, तोरवे, रामचंद्र चरित, बत्तलेश्वर. आसामी : कथा, गीती, कंडाली, दास, कर्बी, महंत रामायण. मराठी : भावार्थ रामायण (संत एकनाथरचित). बंगाली : कृत्तिवास. गुजराथी : राम बालकिया. काश्मिरी : रामावतार चरित. मेघालय : खासी रामायण. मिझोराम : मिझो रामायण. रामाचे नाव रामच आहे, पण लक्ष्मण यात खेना आहे. त्रिपुरा : राम पंचालम. मल्याळम : रामचरितम. तमिळ : कंबरामायण. फारसी : रामायण मसिही (अनुवादक मुल्ला मसिही).

पंथनिहाय रामायणे

जैन पंथ : पद्मचरित (जैन रामायण), अपभ्रंश (आचार्य विमलसुरीकृत)
बौद्ध पंथ : अनामक जातक, दशरथ जातक, दशरथ कथानक
शीख पंथ : गुरु गोविंदसिंग रचित गोविंद रामायण
इतर : मंत्र, गिरीधर, चंपू, आर्ष वा आर्प

परदेशांतील रामायणे

नेपाळ : भानुभक्त कृत रामायण

इंडोनेशिया : काकावीन

कंबोडिया : रामकेर्ती

थायलंड : रामकियेन

लाओस : रामजातक

म्यानमार : रामवत्थू

मलेशिया : हिकायत सेरी राम

फिलिपाईन्स : महालादिया लावन

तिबेट : किंरस-पुंस-पाची रामकथा

चीन : कांग-सेंग-हुई रचित अनामक जातकमचा मँडेरिन भाषेतील अनुवाद लियेऊ-तुत्सी-किंग या ग्रंथात उपलब्ध

तुर्की : खोतानी रामायण

मंगोलिया : दम्दिन सुरेन या विद्वानाने मंगोलियन भाषांतून लिहिलेल्या 4 रामकथांचा वेध घेतला, पैकी एका कथेचा मूळ ग्रंथ रशियात आजही सुरक्षित आहे.

जपान : होबुत्सुशू या प्राचीन जपानी कथांच्या संग्रहातील एक अध्याय म्हणून रामायणाची कथा.

श्रीलंका : मलेराज (पुष्पराज) कथा. कोहंवा देवतेच्या पूजेतील अनुष्ठानात मलेराज कथा सांगण्याची परंपरा आहे. इसवी सन पूर्व 500 मध्ये श्रीलंकेच्या पांडुवासव देव या तत्कालीन सिंहली सम्राटाच्या काळात ही परंपरा सुरू झाली.

Back to top button