Ram Mandir Pran Pratishtha ceremony : चीन; बौद्ध ग्रंथातील कथा | पुढारी

Ram Mandir Pran Pratishtha ceremony : चीन; बौद्ध ग्रंथातील कथा

चीनमध्ये नरसिंह अवताराच्या एतद्देशीय मूर्ती, एतद्देशीय शिवलिंग च्वानजोच्या सागरी संग्रहायलात आजही दिमाखाने मांडलेल्या आहेत. लिउडु जी जिंग या चीनमधील बौद्ध ग्रंथात रामायणाची कथाही येते, हे विशेष! जपानमध्येही गणपतीपासून ते ब्रह्मापर्यंतच्या प्राचीन मूर्ती ठिकठिकाणी आहेत. थायलंडमधील बौद्ध मंदिरांतून रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. थायलंडसह रामकथा ही लाओस या देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मलेशियातील अनेक मुस्लिम आपल्या नावासोबत राम हे नाव जोडून लावतात. ब्रह्मदेशात रामायणाला ‘यमयान’ म्हटले जाते. रामाला येथे यम म्हणतात.

Back to top button