Kangana Ranaut Ayodhya : अभिनेत्री कंगना अयोध्येत दाखल; म्‍हणाले, “एका नवीन युगाची…’ | पुढारी

Kangana Ranaut Ayodhya : अभिनेत्री कंगना अयोध्येत दाखल; म्‍हणाले, "एका नवीन युगाची...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा 22 जानेवारीला हाेणार आहे. देशभरात अभूतपूर्व उत्‍साहात या साेहळ्याची जय्‍यत तयारी सुरु अआहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही अयोध्येला रवाना झाले आहेत. बाॅलीवूड अभिनेत्री कंगना रणावत आज (दि. २०) अयोध्येत दाखल झाली. तिने प्राणप्रतिष्‍ठा समारंभासाठी आमंत्रण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

माध्‍यमाशी बाेलताना कंगना म्‍हणाली की, “राम मंदिर हे मंदिर एका नवीन युगाची सुरुवात आहे. उच्च ऊर्जेचे प्रतीक आहे. ही घटना भारताच्या इतिहासातील एका नवीन अध्यायाची सुरुवात करणारी आहे. लोकांमध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.”

ऐतिहासिक प्रसंगी आमंत्रण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना  कंगना म्‍हणाली, “अयोध्येतील प्राणप्रतिष्‍ठा मागील आयुष्यातील सत्‍कर्मांचे फळ आहे. हा क्षण केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी शुभ आहे. या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील लोक एकत्र येणार आहेत.”

हेही वाचा :

Back to top button