पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यासह भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबित संजय सिंह बबलू यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संजयसिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी भेलुपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संजयसिंह बबलू यांनी पोलिसांना सांगितले की, १२ जानेवारीच्या रात्री त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून दोनवेळा फोन आला. अनोळखी नंबर असल्याने त्याने कॉल रिसिव्ह केला नाही. 13 जानेवारी रोजी त्याच नंबरवरून पुन्हा कॉल येऊ लागले. तिसर्यांदा फोन आला आणि काय प्रकरण आहे ते विचारले. फोन करणाऱ्याने कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्या नंबरवरून सतत येणाऱ्या कॉलमुळे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे, असे संजय सिंह यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.