Marriage Age : हिमाचल प्रदेशात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा २१ वर्षे | पुढारी

Marriage Age : हिमाचल प्रदेशात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा २१ वर्षे

सिमला; वृत्तसंस्था : मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्याबाबत राज्य सरकारने समितीची स्थापना केली होती. या समितीने गेल्याच महिन्यात अहवाल सादर केला होता. या पार्श्वभूमीवर मुलींचे विवाहासाठी किमान वय 21 करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लग्नाच्या वयात मुली प्रगल्भ आणि स्वयंपूर्ण होण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 6 डिसेंबर 2023 रोजी सुधा देवी यांच्या अध्यक्षतेखाली मुलींचे विवाहाचे वय वाढविण्याबाबतच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती.

Back to top button