राम मंदिरासाठी २४,००० किलोची घंटा; २ किमी अंतरापर्यंत घंटानाद | पुढारी

राम मंदिरासाठी २४,००० किलोची घंटा; २ किमी अंतरापर्यंत घंटानाद

आग्रा; वृत्तसंस्था : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी खास 24 हजार किलोची घंटा बनविण्यात आली आहे. यामध्ये 8 धातूंचा वापर करण्यात आला आहे. हा घंटानाद 2 किलोमीटरपर्यंत घुमणार आहे.

सोने, चांदी, जस्त, कथिल, पारा, तांबे, लोखंड आदी विविध 8 धातूंचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. ही देशातील सर्वात मोठी घंटा आहे. राम मंदिरासाठी उद्योगपती आदित्य मित्तल यांनी ही घंटा दान केली आहे. इटाह येथील 30 कारागिरांनी ही घंटा तयार केली आहे. रेल्वेतून ही घंटा मंगळवारी रात्री अयोध्येला आणण्यात आली. उपविभागीय कार्यालयातून ही घंटा वाहनातून अयोध्येत आणण्यात आली. वाहनावरील घंटा पाहून भाविक चकित झाले. दरम्यान, प्रभू श्रीरामासाठी विविध प्रकारचे भोग बनविण्यात येत असून, त्यासाठी चांदीची भांडीही तयार करण्यात येत आहे.

Back to top button