पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह माझ्या कुटुंबाला लक्ष्य करत आहेत, त्यांच्याकडून कुटुंबाला धोका असल्याचा आरोप भारताची ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने केला आहे. आमची सुरक्षा सुनिश्चित करणे सरकारची जबाबदारी आहे, असेही तिने म्हटले आहे.
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित करून त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी बरखास्त केली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, WFI निलंबनानंतर, माजी कुस्तीपटू साक्षी मलिकने बृजभूषण यांच्यावर पुन्हा आरोप केला आहे. "आम्हाला फक्त संजय सिंग यांची समस्या होती. आम्हाला नवीन फेडरेशन बॉडी किंवा तदर्थ समितीशी कोणतीही अडचण नाही. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती करतो की त्यांनी हे सुनिश्चित करावे की, संजय सिंह यांचा WFI मध्ये कोणताही सहभाग नाही. बृजभूषण माझ्या कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. आमची सुरक्षा सुनिश्चित करणे सरकारची जबाबदारी आहे," असे साक्षीने म्हटले आहे.