Stock Market Updates | सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली, ‘हे’ हेवीवेट स्टॉक्स घसरले | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स ७२ हजारांच्या खाली, 'हे' हेवीवेट स्टॉक्स घसरले

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातील कमकुवत संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज मंगळवारी घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ४५० हून अंकांनी घसरून ७१,७०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८९ अंकांच्या घसरणीसह २१,६५० वर व्यवहार करत आहे. विशेषतः हेवीवेट बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्स आज ७२,३३२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,८३९ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, टेक महिंद्रा, विप्रो, कोटक बँक, एलटी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टाटा स्टील हे शेअर्स घसरले. तर सन फार्मा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले आहेत.

sensex opening

निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, एम अँड एम, LTIMINDTREE आणि हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स घसरले. तर डिव्हिज लॅब, सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज, कोल इंडिया हे शेअर्स वाढले आहेत. निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, फायनान्सियल सर्व्हिसेस हेदेखील घसरले. (Stock Market Updates)

चीनच्या संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे आशियाई बाजार घसरले आहेत. नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे सोमवारी अमेरिकेतील बाजार बंद होता.

हे ही वाचा :

 

Back to top button