सावधगिरी बाळगा..! कोरोनाचे नवे ६३६ रुग्‍ण, तिघांचा मृत्‍यू | पुढारी

सावधगिरी बाळगा..! कोरोनाचे नवे ६३६ रुग्‍ण, तिघांचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मागील २४ तासांच्या कालावधीत ६३६ नव्‍या रुग्‍णांची भर पडली आहे. तिघांच्‍या मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत कोरोनाचे 4652 रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यात हा आकडा 3818 होता. कोरोनाचा नवा व्‍हेरियंट JN.1, ची संसर्गात वाढ होताना दिसत आहे. घाबरण्याची गरज नाही. सावधगिरी बाळगा आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

केरळमधील रुग्‍णसंख्‍येत घट

देशभरात कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ दिसत असताना केरळमधॅल रुग्‍णसंख्‍येत घट होताना दिसत आहे. केरळमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे 3018 नवीन रुग्ण आढळून आले आहेत ही दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या इतर अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये कोरोनाचे ९२२ रुग्ण आढळले, जे मागील आठवड्याच्या तुलनेत तीन पटीने वाढले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या 103 वरून 620 वर पोहोचली आहे.

सक्रिय प्रकरणांची संख्या 4394 वर

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 4394 वर पोहोचले आहेत. त्यापैकी 1869 सक्रिय प्रकरणे फक्त केरळमध्ये आहेत. रविवारी केरळमध्ये कोरोनाचे 213 सक्रिय रुग्ण आढळले. तर कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या 1000 वर पोहोचली आहे. रविवारी कर्नाटकात कोरोनाचे 167 सक्रिय रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 693 सक्रिय रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा १७५ आहे. आंध्र प्रदेशात 109 सक्रिय प्रकरणे आहेत. देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी केरळमध्ये दोन आणि तामिळनाडूमध्ये एक मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराची प्रकरणेही वाढत आहेत. तथापि, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की घाबरण्याची गरज नाही, फक्त सावधगिरी बाळगा आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा.

हेही वाचा : 

Back to top button