LokSabha 2024 | ‘शुक्रिया मोदी भाईजान’ : मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भाजपची नवी कँपेन

LokSabha 2024 | ‘शुक्रिया मोदी भाईजान’ : मुस्लिम महिलांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भाजपची नवी कँपेन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुस्लिम महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी "शुक्रिया मोदी भाईजान" नवी कँपेन लाँच केली जाणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ही मोहीम सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदार संघात 1 हजार मुस्लिम महिलांना पक्षासोबत जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Shukriya Modi Bhaijaan)

ही मोहीम २ जानेवारीला सुरू होईल आणि ती पूर्ण एक महिना चालेल. उत्तर प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित अली यांनी ही माहिती दिली आहे. 'ना दुरी है, ना खाई है मोदी हमारा भाई है' या टॅग लाईनने ही कँपेन चालवली जाणार आहे. (Shukriya Modi Bhaijaan)

केंद्र सरकारने राबवलेले विविध उपक्रम मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत, त्यातून महिलांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. याशिवाय उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना अशा विविध योजनांचा लाभ मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठीही पक्षातर्फे प्रयत्न केले जातील. प्रत्येक लोकसभा मतदार संघात ही मोहीम राबवली जाईल, असे डेक्कन हेराल्डच्या बातमीत म्हटले आहे.

अली म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध कल्याणकारी योजना राबवताना महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि महिलांचे नाते हे भावाबहिणीचे बनले आहे. त्यामुळे 'शुक्रिया मोदी भाईजान' असे या मोहिमेलान नाव दिले आहे."

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news