उत्तर भारतात दाट धुक्याचा पुन्हा रेड अलर्ट | पुढारी

उत्तर भारतात दाट धुक्याचा पुन्हा रेड अलर्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर भारतात आणखी काही दिवस दाट धुके राहण्याचा पुन्हा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. दाट धुक्यामुळे देशभरातील सुमारे 271 विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला आहे तर सुमारे डझनभर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. केवळ दिल्लीत 100 विमानांनी उशिरा उड्डाणे झाली आहेत. त्याशिवाय 80 पेक्षा अधिक रेल्वे 8 ते 10 तासांनी उशिरा धावत आहेत.

उत्तर प्रदेशातील 51 जिल्हात धुक्याचा रेड अलर्ट दिला आहे. सातपेक्षा अधिक शहरांत तापमानाचा पारा घसरला आहे, या शहरांतील द़ृश्यमानता 5 ते 10 मीटरपर्यंत पोहोचली आहे. तर मध्य प्रदेशातील7 जिल्ह्यात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत हलका पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Back to top button