Jagdeep Dhankhar On Arvind Kejriwal : जगदीप धनखड यांचा केजरीवालांना धक्का: राघव चड्ढा यांना नेतेपद देण्याची विनंती फेटाळली | पुढारी

Jagdeep Dhankhar On Arvind Kejriwal : जगदीप धनखड यांचा केजरीवालांना धक्का: राघव चड्ढा यांना नेतेपद देण्याची विनंती फेटाळली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी खासदार राघव चड्ढा यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आम आदमी पार्टी (आप) चे अंतरिम नेते म्हणून नियुक्ती करण्याची विनंती फेटाळली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनखड यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘संसदातील मान्यताप्राप्त पक्ष आणि गटांचे नेते कायदा 1998’ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या अधीन आहे. विनंती कायदेशीर प्रक्रियेनुसार नाही, म्हणून ती स्वीकारली जात नाही. Jagdeep Dhankhar On Arvind Kejriwal

वास्तविक, खासदार संजय सिंह हे राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे नेते आहेत. मद्य घोटाळ्यात अटक झाल्यापासून आम आदमी पार्टीला राज्यसभेत नेता नाही. या कारणास्तव आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी राघव चड्डा यांना नेता म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली होती. धनखड यांनी नियमांचा हवाला देत केजरीवाल यांची विनंती फेटाळल्यानंतर संजय सिंह वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते राहतील. Jagdeep Dhankhar On Arvind Kejriwal

दरम्यान, राज्यसभा सचिवालयाला ‘आप’कडून चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते. हे पत्र अंमलबजावणीसाठी राज्यसभेच्या सरचिटणीसांकडे पाठवले होते. चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. सध्या ‘आप’चे वरिष्ठ सभागृहात एकूण १० सदस्य आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नंतर राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. नुकतेच राघव चढ्ढा यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द  केले होते. परंतु गदारोळ झाल्यानंतर अखेर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button