Ayodhya Dham : अयोध्याधाम जंक्शन नव्हे विमानतळच!

Ayodhya Dham : अयोध्याधाम जंक्शन नव्हे विमानतळच!
Published on
Updated on

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर अयोध्या धाम जंक्शन हे रेल्वे स्थानकही भव्य आणि प्रशस्त आहे. भारतीय वास्तुरचनेची वैशिष्ट्ये कायम ठेवत आधुनिक स्थापत्य शास्त्राने उभारले जाणारे हे रेल्वे स्टेशन एखाद्या विमानतळापेक्षा कमी नाही. अयोध्या धाम रेल्वे जंक्शन नावाने ओळखले जाणारे हे रेल्वे स्टेशन अयोध्येचाच नव्हे, तर उत्तर प्रदेशचाही गौरव ठरणार आहे. (Ayodhya Dham)

नव्या अयोध्या धाम जंक्शनच्या बाजूलाच जुने अयोध्या रेल्वे स्टेशन आहे. ब्रिटिशकालीन वळणाचे जुन्या काळातले हे स्टेशन आणि शेजारीच उभे राहणारे भव्य जंक्शन यांच्यातील फरक लगेचच डोळ्यात भरणारा आहे. राजस्थानातील बन्सीपहाडपूर इथून आणलेल्या लालसर गुलाबी दगडांच्या वापराने या वास्तूला शोभा आणली आहे. बाहेरून या जंक्शनकडे पाहतानाच या वास्तूच्या शीर्षस्थानी विराजमान श्रीरामाचा मुकुट लक्ष वेधून घेतो. त्याखाली धनुष्याचे शिल्प आणि समोर तसेच डावी उजवीकडे असलेले 4 कळस हे सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा पंचायतनाचं प्रतिनिधित्व करतात. (Ayodhya Dham)

पुढे सुमारे 15 मीटर उंच स्तंभांच्या दर्शनी व्हरांड्यातून तुम्ही इथल्या विविध गेटस्मधून स्टेशनात प्रवेश करता. ही गेटस् एअरपोर्टवर असलेल्या गेटस्सारखीच भासतात. आत जाताच या वास्तूची भव्यता, आधुनिकता प्रकर्षाने जाणवते.

प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी इथे योजण्यात आलेले कक्ष, तंत्रज्ञान, उपकरणे पाहिली तर हे स्टेशन उत्तर प्रदेशातल्या लहानशा अयोध्येत आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही. दररोज अगदी 50 हजार प्रवासी आले तरी त्यांची गैरसोय होणार नाही, हा प्रशासनाचा दावा इथे आल्यावर पटतो. सध्या फक्त शहरातील रेल्वे स्टेशन्स किंवा मेट्रो स्टेशन्सवर दिसणार्‍या लिफ्ट, एस्कलेटर्स इथे दिसतात. नैसर्गिक प्रकाशासाठी छतावर काचेची तावदानं सोडल्यास हे स्टेशन वातानुकूलनासाठी बंदिस्त स्वरूपाचे आहे. ज्यामुळे उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत आणि प्रचंड उष्म्यातही वातावरण नियंत्रित राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news