Karnataka : आता कर्नाटकात दुकानांवर कन्नड भाषेत पाट्या! सिद्धरामय्या सरकारचा निर्णय | पुढारी

Karnataka : आता कर्नाटकात दुकानांवर कन्नड भाषेत पाट्या! सिद्धरामय्या सरकारचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्यवसायांमध्ये ६० टक्के कन्नड भाषेतील नावाच्या पाट्या असायला हव्यात, असा निर्णय आज घेण्यात आला आहे. (Karnataka ) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतला. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने माहिती दिलीय. (Karnataka )

बंगळुरू पोलिसांनी बुधवारी कन्नड नावाच्या पाट्या लावण्याबाबत आंदोलन करत असलेल्या कर्नाटक रक्षणा वेदिके (केआरवी) च्या एका सदस्याला ताब्यात घेतलं होतं. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी ऑफिस आणि दुकानांमध्ये जबरदस्ती कन्नड नावाच्या पाट्या संदर्भात गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. सीएम सिद्धारमैया म्हणाले, आंदोलन करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली जाईल.

याआधी बुधवारी फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (एफकेसीसीआई) ने सर्व नावांच्या पाट्यांवर ६० टक्क्याहून अधिक शब्द कन्नडमध्ये बीबीएमपीच्या निर्देशांवर चिंता व्यक्त केली होती.

केआरवीचे अध्यक्ष म्हणाले, अनेक लोक बाहेरील राज्यातून बंगळूरूमध्ये व्यवसाय करण्यासाठी येतात. ते कन्नडमध्ये नावाच्या पाट्या लावण्यासाठी तयार नाही. जर त्यांना बंगळुरूमध्ये राहायचे असेल तर कन्नड फलक लावायला हवा. नाही तर त्यांनी दुसऱ्या राज्यात जावं.

Back to top button