Ayodhya : अयोध्येत आणखी ७ मंदिरे साकारणार

Ayodhya Ram temple
Ayodhya Ram temple
Published on
Updated on

अयोध्या; वृत्तसंस्था : (Ayodhya) अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. आता या मंदिर परिसरात आणखी 7 मंदिरे बांधली जात आहेत. यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे गुरू ब्रह्मर्षी वशिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, रामायण लेखक महर्षी वाल्मीकी, अगस्त्य मुनी, राम भक्त केवत, निषादराज आणि शबरी यांच्या मंदिरांचा समावेश आहे.

या सर्व मंदिरांचे बांधकाम 2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, तीन मजली श्रीराम मंदिराच्या दुसर्‍या मजल्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. तळमजला पूर्णपणे तयार आहे. पहिला मजलाही जवळपास तयार होत आला आहे. अशा स्वरूपाची मंदिरनिर्मिती उत्तर भारतात 200 वर्षांत झालेली नाही. मंदिरासाठी खास प्रकारच्या भिंती बांधल्या जात आहेत. अशा भिंती फक्त तामिळनाडू आणि केरळच्या मंदिरांत बांधल्या जातात. हा एक नवीन प्रयोग आहे. (Ayodhya)

सध्या 70 एकरांपैकी 30 टक्के जागेवर बांधकाम सुरू आहे. उर्वरित जमिनीवर अनेक प्रकारची रोपे लावली जाणार आहेत. श्रीराम मंदिराभोवती भिंत बांधली जात आहे. उर्वरित मंदिरे लहान भागांमध्ये बांधली जात आहेत. कारण, ज्या भूखंडाविषयी 70 वर्षे न्यायालयात खटला सुरू होता, त्याच ठिकाणी मंदिर उभारता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन

अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. यानंतर मोदी अयोध्येत एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. याच दिवशी अयोध्येतील भव्य रेल्वेस्थानकाचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होईल. 'अयोध्या धाम' असे या स्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.(Ayodhya)

विविध कोपर्‍यांत मंदिरांची रचना

मुख्य मंदिराच्या एका कोपर्‍यात सूर्य मंदिर असेल. दुसर्‍या कोपर्‍यात शंकराचे मंदिर आहे. तिसर्‍या बाजूला भगवती मंदिर, चौथ्या बाजूला गणेश मंदिर आणि दक्षिणेला हनुमान मंदिर असेल. कुबेर टिळ्यावर जटायूची मूर्ती बसवली जात आहे, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले.

     हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news