Sandeep Maheshwari-Vivek Bindra : दोन मोठ्या मोटिव्हेशनल स्पीकर्समध्ये जुंपली, नेमकं काय घडलं? | पुढारी

Sandeep Maheshwari-Vivek Bindra : दोन मोठ्या मोटिव्हेशनल स्पीकर्समध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध दोन मोठे मोटिव्हेशनल स्पीकर्स, यु-ट्युबर्स संदीप माहेश्वरी आणि विवेक बिद्रा यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोघेही एकमेकांच्या बिझनेस आणि स्पीक वरून आरोप करताहेत. (Sandeep Maheshwari-Vivek Bindra) सोशल मीडियावर दोघांमध्ये व्हिडिओ वॉर पाहायला मिळत असून नेटकऱ्यांकडून दोघांवरही कॉमेंट्स येत आहेत. (Sandeep Maheshwari-Vivek Bindra)

व्हिडिओवरून वाद सुरू

युट्युबर आणि मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये संदीप माहेश्वरी यांनी मोठा घोटाळा उघड झाल्याचा दावा केला. माहेश्वरी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पणे, एका स्कॅमचा उल्लेख करत मल्टी लेव्हल मार्केटिंगबाबत भाष्य केले. शिवाय, या स्कॅममध्ये लोक कसे अडकले, याबाबत सांगितले. हा व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी विवेक बिंद्रा यांनी आक्षेप घेत माहेश्वरी यांना सुनावले होते.

विवेक बिंद्रा यांचं मॉडेल स्कॅम कसं करतं, माहेश्वरींनी केलं उघड

या व्हिडिओत संदीप माहेश्वरी यांनी बिंद्रा यांचा बिझनेस मॉडेल कशाप्रकारे स्कॅम करते, हे सांगितले. शिवाय, विवेक बिंद्रा यांच्या डॉक्टरेटबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय, काही मुलांचे व्हिडिओ दाखवले, ज्यामध्ये विवेक बिंद्रा यांच्या ‘बडा बिजनेस’वर काही मुले आरोप करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये संदीप दोन मुलांशी बोलताना दिसत आहे, जे म्हणतात की त्यांनी ‘मोठ्या YouTuber’ कडून व्यवसाय शिकण्यासाठी अभ्यासक्रम खरेदी केला होता. एकाने ५० हजार रुपयांना, तर दुसऱ्याने ३५ हजार रुपयांना विकत घेतला. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही.

त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो की ‘व्यवसायिकाऐवजी सेल्समन बनवत आहे.’ अभ्यासक्रम एक लाख रुपयांपासून १० लाखांपर्यंत विकले जात आहेत. विद्यार्थ्यांना अधिक लक्ष्य केले जात आहे. व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाला उत्पादन म्हणतात. ते विकत घेतल्यानंतर अधिक लोकांना विकण्यास सांगितले जाते. म्हणजे एक प्रकारे मल्टी लेव्हल मार्केटिंग. मुलांचे हे शब्द ऐकून संदीप माहेश्वरी आश्चर्य व्यक्त करतो आणि हा मोठा घोटाळा असून तो थांबवावा, असे म्हणतो.

विवेक बिंद्रा एक मोटिव्हेशनल स्पीकर, प्रसिद्ध युट्यूबर आणि बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत.

Back to top button