BJP On Congress: काँग्रेसला शेतकरी-जाट पुत्रांविषयी घृणा का? भाजपचा राहुल गांधींवर निशाणा

BJP On Congress
BJP On Congress
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: दरवर्षी २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. दरम्यान काँग्रेसकडून या दिवसाच्या शुभेच्छा देताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यावरून भाजपने काँग्रेसला शेतकरी-जाट पुत्रांविषयी घृणा का? असा सवाल उपस्थित केला आहे. यावरून भाजपने राहुल गांधींवर देखील निशाणा साधला आहे. या संदर्भातील पोस्ट भाजपने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (BJP On Congress)

भाजपने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या राजपुत्राने राज्यसभा शेतकरी व जाटपुत्र सभापती जगदीप धनखड यांचा अपमान केला. तर आज काँग्रेसचे शेतकरी मसिहा माजी पंतप्रधान स्व. ती चौधरी चरणसिंग यांचा अपमान करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. (BJP On Congress)

चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या स्मरणार्थ आज देशभरात शेतकरी दिन साजरा केला जातो. पण आजही काँग्रेस फक्त राहुल गांधींच्या प्रचारात गुंतलेली आहे. त्यामुळे काँग्रेस शेतकरी आणि जाटपुत्रांचा एवढा द्वेष का करते? असा सवाल भाजपने पुन्हा उपस्थित केला आहे. (BJP On Congress)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news