Israel-Hamas war : गाझात 20 हजार मृत्यू | पुढारी

Israel-Hamas war : गाझात 20 हजार मृत्यू

तेल अवीव, वृत्तसंस्था : हमासने 40 ज्यू ओलिसांची सुटका करावी, त्या बदल्यात इस्रायल 7 दिवस गाझावर हल्ले करणार नाही, असा इस्रायलचा प्रस्ताव हमासने फेटाळून लावला आहे. हमासला आपल्या अटीशर्तींवर युद्धबंदी हवी असेल तर कितीही दबाव आला तरी आम्ही तसे करणार नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. (Israel-Hamas war)

हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख इस्माईल हनिये इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले असून, येथेच ओलिसांच्या सुटकेबाबत चर्चा झाली. 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत सुमारे 20 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांत 6 हजारांहून अधिक मुले आहेत. यादरम्यान 1200 इस्रायली लोक मारले गेले आहेत.

Back to top button