Jammu Terror Attack : पुंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद | पुढारी

Jammu Terror Attack : पुंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Jammu Terror Attack : जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन गाड्यांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तत्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरी-थानमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हे वाहन बुफलियाज येथून सैनिकांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये बुधवारपासून (20 डिसेंबर) दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे.

 

Back to top button