Minister Mangal Prabhat Lodha : जगदीप धनखड नक्कल प्रकरणी राज्यातील ‘या’ मंत्र्याने दाखल केली तक्रार | पुढारी

Minister Mangal Prabhat Lodha : जगदीप धनखड नक्कल प्रकरणी राज्यातील 'या' मंत्र्याने दाखल केली तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा सभापती जगदीप धनखड नक्कल केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तक्रार दाखल केली आहे. संसदेच्या विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनावरून संसदेच्या मकरद्वार येथे आंदोलन सुरू होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांची नक्कल केली तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याचे चित्रिकरण केले. या घटनेवरून देशासह अनेक राज्यात भाजप कार्यकर्त्यांच्यात असंतोष पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. ( Minister Mangal Prabhat Lodha)

महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मिमिक्रीच्या वादावर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे. (Minister Mangal Prabhat Lodha)

 Minister Mangal Prabhat Lodha: नेमकं काय घडलं होतं?

संसद सुरक्षा भंग प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. दरम्यान संसद शिस्तभंगावरून कारवाई करत दोन्ही सभागृहातील विरोधकांच्या १४१ खासदारांनी निलंबित करण्यात आले. यानंतर निलंबित खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराजवळ आंदोलन केले. दरम्यान मकरद्वार येथे आंदोलन सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी विधानसभा सभापती धनखड यांची नक्कल केली तर राहुल गांधी यांनी चित्रीकरण केले. या घटनेचा जाट समाजासह, भाजप आणि अनेक राज्यात पडसाद उमटले. स्वत: धनखड यांनी देखील ही घटना लज्जास्पद आणि अस्वीकार्य असल्याचे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली. (Minister Mangal Prabhat Lodha)

हेही वाचा:

Back to top button